चक्रध्यान साधना - लेवल २
कालावधी: १ महिना (१ वर्षाच्या पर्यायात वर्षभर सराव ॲक्सेस)
२१ दिवसांची साधना + १ महिना ॲक्सेस
₹3,500 ₹5,000 30% सूट
वैधता: १ महिना
१ वर्षाचा सराव ॲक्सेस
₹7,000 ₹20,000 65% सूट
वैधता: १ वर्ष
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
२१ दिवसांच्या ध्यानात काय अपेक्षित आहे?
ध्यानाचे व्हिडिओ आणि रोज दिलेला टास्क हे दोन्ही जेव्हा कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे 21 दिवस ये ध्यान हे फक्त ध्यान नसून आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याच्या दृष्टीने मी ते डिझाईन केलेले आहे. आपण या बाह्य जगामध्ये इतके गुंतलेले असतो की आपण स्वतःच्या आत कधी डोकावून बघत नाही. गेल्या 12 वर्षांच्या डीप सेल्युलर हीलिंग च्या अनुभवातून हा कोर्स डिझाईन केलेला आहे त्यामुळे तुम्हाला वैयक्तिक स्तरावर जे अनुभव येतील ते येऊ द्या. तुमच्याही नकळत तुमचे आतून डिटॉक्स आणि हीलिंग होत आहे.
मला काहीच अनुभव आला नाही तर?
काहींना याचा अगदी पहिल्या दिवसापासून अनुभव येतो तर काहींना 21 दिवसानंतर यायला लागतो. जे कोणी प्रामाणिकपणे ध्यान आणि टास्क दोन्ही करतात त्यांना हे अनुभव आल्याशिवाय राहत नाही फक्त आपापल्या पेसनुसार. त्यामुळे जर कोणाला काहीच अनुभव आले नाही तरी काळजी करू नका तुमच्याही नकळत आत ती प्रोसेस चालू आहे. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी अगदी योग्य पद्धतीने करत आहे just follow the process. हे ध्यान प्रक्रिया म्हणजे स्पर्धा नाही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक जर्नी आहे. प्रत्येकाला आपापल्या पेसनुसार वेगवेगळे अनुभव येतील. व्यक्ती तितक्या प्रकृती सगळ्यांचे अनुभव हे एक सारखे असतीलच असे नाही.
ध्यानानंतर शरीरात बदल जाणवले तर?
मूलाधार चक्र व स्वादिष्टांत चक्र अपान वायूशी संबंधित आहे. अपान वायूचे काम शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकणं हे आहे. त्यामुळे काहींना शारीरिक स्तरावर तशा पद्धतीचे अनुभव येऊ शकतात, जसे की मासिक पाळी सुरू होणे वारंवार लघवीला जावेसे वाटणे संडासाला दोन किंवा तीन वेळा जावेसे वाटणे. हे अगदी नैसर्गिक आहे. प्रत्येकाला हे असं जाणवायलाच पाहिजे असा काही नियम नाही. कोणाला असे अनुभव येत असतील तर हे नैसर्गिक आहे काळजी करू नका.
ध्यानानंतर रडायला आलं तर?
मूलाधार चक्र हे आपल्या स्मृतींचे स्थान असते. त्यामुळे काही जणांना ध्यान केल्यानंतर कारणाशिवाय रडायला येऊ शकते, जुन्या काही आठवणी प्रकर्षाने जाणवू किंवा दिसू लागतात. हे सगळं अगदी नैसर्गिक आहे तसे अनुभव आल्यास घाबरून जाऊ नये. रडायला आलं तर मनसोक्त रडावे, एक प्रकारची ती डिटॉक्स प्रोसेस आहे. ज्यांनी आयुष्यामध्ये खूप चॅलेंजेस अनुभवलेले असतात त्यांना अशा पद्धतीने अनुभव येऊ शकतो, तोही पहिल्याच बैठकीत येईल असे नाही. सातत्याने ध्यान केल्यानंतर काही दिवसानंतर सुद्धा असा अनुभव येऊ शकतो.
आम्ही तुमच्याशी संपर्क करू
तुमचा नंबर द्या, आम्ही WhatsApp वर संपर्क करू.