Kalpavruksha Soulistic

← सर्व अभ्यासक्रम

चक्रध्यान साधना - लेवल १

चक्रध्यान साधना - लेवल १

कालावधी: १ महिना (१ वर्षाच्या पर्यायात वर्षभर सराव ॲक्सेस)

२१ दिवसांची साधना + १ महिना ॲक्सेस

₹1,600 ₹2,000 20% सूट

वैधता: १ महिना

१ वर्षाचा सराव ॲक्सेस

₹5,000 ₹10,000 50% सूट

वैधता: १ वर्ष

🧘🏻‍♀️ २१ दिवसीय चक्रध्यान साधना Chakradhyan Sadhana – Level 1 आपली ऊर्जा जागृत करा. मनाला संतुलित करा. जीवनाला नवी दिशा द्या! कधी असं वाटतं का की मन अस्वस्थ आहे, ऊर्जा कमी झाली आहे किंवा जीवनात काहीतरी अडकल्यासारखं वाटतंय? तणाव, नकारात्मक विचार आणि भावनिक असंतुलन यांमुळे आपण अनेकदा स्वतःपासून दूर जातो. चला, या २१ दिवसांच्या चक्रध्यान साधनेतून स्वतःशी पुन्हा जोडले जाऊया! डॉ. सीमा गोवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तचक्रांची ओळख करून घ्या आणि ध्यानाच्या माध्यमातून अंतर्मनातील शांतता, जागरूकता आणि सकारात्मकता वाढवण्याचा प्रयत्न करा. 🌈 या साधनेत तुम्ही काय शिकाल? 🔹 सप्तचक्रांची ओळख शरीरातील सात चक्रांची स्थिती, कार्य आणि मन व शरीराशी असलेला त्यांचा संबंध समजून घ्या. 🔹 चक्र संतुलनाचे महत्त्व चक्र संतुलनाची संकल्पना आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचे महत्त्व जाणून घ्या. 🔹 चक्रध्यान साधना प्रत्येक चक्रासाठी विशिष्ट ध्यान पद्धतींचा नियमित सराव करा. 🔹 मंत्र आणि रंग ध्यान मंत्र, रंग आणि एकाग्रतेच्या माध्यमातून ध्यानाचा अनुभव अधिक समृद्ध करा. 🔹 दैनंदिन साधना आणि असाइनमेंट्स प्रत्येक दिवशी तुम्हाला एक असाइनमेंट दिले जाईल. तुमचा अनुभव अधिक सखोल करण्यासाठी ती श्रद्धेने आणि नियमितपणे पूर्ण करा. तुमची असाइनमेंट Student Portal वर सबमिट करा. साधनेदरम्यान कुठे अडचण आली किंवा काही समजले नाही, तर तुमच्या अनुभवाच्या आधारे मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकेन. 🌅 रोजची Live Chakra Meditation साधना तुमच्या सोयीसाठी रोजच्या ध्यान साधनेत सहभागी होण्याचे दोन पर्याय! 🕔 सकाळी ५:०० वाजताची Live Batch 🕕 सकाळी ६:०० वाजताची Live Batch तुमच्या वेळेनुसार कोणत्याही एका Live Batch मध्ये सहभागी व्हा आणि माझ्या मार्गदर्शनाखाली नियमित चक्रध्यान साधना करा. Live साधनेला उपस्थित राहणे शक्य नसेल तर? काळजी करू नका! तुमच्या सोयीसाठी ध्यानाचे Recording उपलब्ध असेल. तुमच्या सोयीच्या वेळेनुसार Recording पाहून ध्यान करा. दिवसभरात तुम्हाला हवे तितक्या वेळा ध्यानाची पुनरावृत्ती करू शकता. तुमच्या गतीने साधना करा आणि स्वतःसाठी शांत वेळ निर्माण करा. "Live असो किंवा Recording — तुमची साधना, तुमची वेळ, तुमचा प्रवास!" ⏳ कोर्सचा कालावधी आणि ॲक्सेस साधनेचा कालावधी: २१ दिवस कोर्स ॲक्सेस: १ महिना दैनंदिन ध्यान आणि असाइनमेंट्स: २१ दिवस ऐच्छिक १ वर्षाचा ॲक्सेस: अधिक सराव, पुनरावृत्ती आणि ध्यानाचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी उपलब्ध २१ दिवसांची साधना पूर्ण झाल्यानंतरही तुम्हाला ध्यानाचा सराव सुरू ठेवायचा असेल, तर १ वर्षाचा ॲक्सेस निवडू शकता. ✨ तुमच्या साधनेसोबत खास भेट! 🎁 ८ दिवसीय योगनिद्रा कोर्स – ₹७५० मूल्याचा मोफत 💰 कोर्स शुल्क २१ दिवसांची साधना + १ महिना ॲक्सेस: ₹१,६००/- (नियमित ₹२,०००/-) १ वर्षाचा सराव ॲक्सेस: ₹५,०००/- (नियमित ₹१०,०००/-) 🌿 तुमच्या परिवर्तनाची पहिली पायरी चक्रध्यान ही स्वतःकडे वळण्याची, मन शांत करण्याची आणि स्वतःच्या भावनिक व आध्यात्मिक प्रवासाची जाणीव वाढवण्याची एक सुंदर साधना आहे. नियमित साधना करा. असाइनमेंट्स पूर्ण करा. आपल्या अनुभवातून शिका आणि गरज पडल्यास माझे मार्गदर्शन घ्या. आजच सुरुवात करा — कारण तुमच्या जीवनातील सुंदर बदलाची सुरुवात तुमच्यापासूनच होते!

परिवर्तनाचा प्रवास सुरू करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

२१ दिवसांच्या ध्यानात काय अपेक्षित आहे?

ध्यानाचे व्हिडिओ आणि रोज दिलेला टास्क हे दोन्ही जेव्हा कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे 21 दिवस ये ध्यान हे फक्त ध्यान नसून आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याच्या दृष्टीने मी ते डिझाईन केलेले आहे. आपण या बाह्य जगामध्ये इतके गुंतलेले असतो की आपण स्वतःच्या आत कधी डोकावून बघत नाही. गेल्या 12 वर्षांच्या डीप सेल्युलर हीलिंग च्या अनुभवातून हा कोर्स डिझाईन केलेला आहे त्यामुळे तुम्हाला वैयक्तिक स्तरावर जे अनुभव येतील ते येऊ द्या. तुमच्याही नकळत तुमचे आतून डिटॉक्स आणि हीलिंग होत आहे.

मला काहीच अनुभव आला नाही तर?

काहींना याचा अगदी पहिल्या दिवसापासून अनुभव येतो तर काहींना 21 दिवसानंतर यायला लागतो. जे कोणी प्रामाणिकपणे ध्यान आणि टास्क दोन्ही करतात त्यांना हे अनुभव आल्याशिवाय राहत नाही फक्त आपापल्या पेसनुसार. त्यामुळे जर कोणाला काहीच अनुभव आले नाही तरी काळजी करू नका तुमच्याही नकळत आत ती प्रोसेस चालू आहे. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी अगदी योग्य पद्धतीने करत आहे just follow the process. हे ध्यान प्रक्रिया म्हणजे स्पर्धा नाही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक जर्नी आहे. प्रत्येकाला आपापल्या पेसनुसार वेगवेगळे अनुभव येतील. व्यक्ती तितक्या प्रकृती सगळ्यांचे अनुभव हे एक सारखे असतीलच असे नाही.

ध्यानानंतर शरीरात बदल जाणवले तर?

मूलाधार चक्र व स्वादिष्टांत चक्र अपान वायूशी संबंधित आहे. अपान वायूचे काम शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकणं हे आहे. त्यामुळे काहींना शारीरिक स्तरावर तशा पद्धतीचे अनुभव येऊ शकतात, जसे की मासिक पाळी सुरू होणे वारंवार लघवीला जावेसे वाटणे संडासाला दोन किंवा तीन वेळा जावेसे वाटणे. हे अगदी नैसर्गिक आहे. प्रत्येकाला हे असं जाणवायलाच पाहिजे असा काही नियम नाही. कोणाला असे अनुभव येत असतील तर हे नैसर्गिक आहे काळजी करू नका.

ध्यानानंतर रडायला आलं तर?

मूलाधार चक्र हे आपल्या स्मृतींचे स्थान असते. त्यामुळे काही जणांना ध्यान केल्यानंतर कारणाशिवाय रडायला येऊ शकते, जुन्या काही आठवणी प्रकर्षाने जाणवू किंवा दिसू लागतात. हे सगळं अगदी नैसर्गिक आहे तसे अनुभव आल्यास घाबरून जाऊ नये. रडायला आलं तर मनसोक्त रडावे, एक प्रकारची ती डिटॉक्स प्रोसेस आहे. ज्यांनी आयुष्यामध्ये खूप चॅलेंजेस अनुभवलेले असतात त्यांना अशा पद्धतीने अनुभव येऊ शकतो, तोही पहिल्याच बैठकीत येईल असे नाही. सातत्याने ध्यान केल्यानंतर काही दिवसानंतर सुद्धा असा अनुभव येऊ शकतो.

आम्ही तुमच्याशी संपर्क करू

तुमचा नंबर द्या, आम्ही WhatsApp वर संपर्क करू.

WhatsApp